पोथी
←

श्री गणपतीची आरती - सुखकर्ता - दुःखहर्ता

श्री गणपतीची आरती - सुखकर्ता - दुःखहर्ता

श्री गणेश आरती

दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ।नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ।सर्वांगी सुंदर उटी शेंदूराची ।कंठी झळके माळ मुक्ताफळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती ।दर्शनमात्रे मन कामनापूर्ती ॥ जय देव जय देव ॥ १ ॥

रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा ।चंदनाची उटी कुंकुम केशरा ।हीरे जडित मुकुट शोभतो बरा ।रुणुझुणती नूपुरे चरणी घागरिया ॥ जय देव जय देव ॥ २ ॥

लंबोदर पीतांबर फणिवरबंधना ।सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।दास रामाचा वाट पाहे सदना ।संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना ॥ जय देव जय देव ॥ ३ ॥

तुमचे वाचन सोबत ठेवा

साइन इन केल्यावर सर्व उपकरणांवर वाचनाची जागा जतन होते, भावार्थ पाहता येतो, रोजचे वाचन नोंदवता येते आणि निवडलेली स्मरणे मिळतात.