पोथी
←

श्री देवीची आरती - दुर्गे दुर्घट भारी

श्री देवीची आरती - दुर्गे दुर्घट भारी

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥ १ ॥

वारी वारीं जन्ममरणाते वारी ।हारी पडलो आता संकट नीवारी ॥ २ ॥

जय देवी जय देवी जय महिषासुरमथनी ।सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥ ३ ॥

त्रिभुवनी भुवनी पाहतां तुज ऎसे नाही ।चारी श्रमले परंतु न बोलावे काहीं ॥ ४ ॥

साही विवाद करितां पडिले प्रवाही ।ते तूं भक्तालागी पावसि लवलाही ॥ ५ ॥

जय देवी जय देवी जय महिषासुरमथनी ।सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥ ६ ॥

प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासां ।क्लेशापासूनि सोडी तोडी भवपाशा ॥ ७ ॥

अंबे तुजवांचून कोण पुरविल आशा ।नरहरि तल्लिन झाला पदपंकजलेशा ॥ ८ ॥

नरहरि तल्लिन झाला पदपंकजलेशा ॥ ९ ॥

जय देवी जय देवी जय महिषासुरमथनी ।सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥ १० ॥

तुमचे वाचन सोबत ठेवा

साइन इन केल्यावर सर्व उपकरणांवर वाचनाची जागा जतन होते, भावार्थ पाहता येतो, रोजचे वाचन नोंदवता येते आणि निवडलेली स्मरणे मिळतात.