पोथी
←

श्री व्यंकटेश आरती

श्री व्यंकटेश आरती

शेषाचल अवतार तारक तूं देवा ।सुरवर मुनिवर भावें करिती जन सेवा ॥ १ ॥

कमलारमणा अससी अगणित गुण ठेवा ।कमलाक्षा मज रक्षुनि सत्वर वर द्यावा ॥ २ ॥

जय देव जय देव जय व्यंकटेशा ।केवळ करूणासिंधु पुरविसी आशा ।जय देव जय देव ॥ ३ ॥

हे निजवैकुंठ म्हणुनी ध्यातों मी तू तें ।दाखविसी गुण कैसे सकळिक लोकाते ॥ ४ ॥

देखुनि तुझे स्वरूप सुख अद्‌भुत होते ।ध्यातां तुजला श्रीपति दृढ मानस होते ॥ ५ ॥

जय देव व्यंकटेशा ।महाविष्णू हे परेशा ॥ ६ ॥

आरती ओवळीतो ।तुज चिन्मय अविनाशा ॥ ७ ॥

भावार्थ कानगिसी भक्तांपासी तूं मागसी ।अज्ञान छेदुनियां ॥ ८ ॥

भवसंकट वारीसी ।देवोनी स्वात्मबोधा ।परमानंदी तूं ठेवीसी ॥ ९ ॥

तत्वंपदभेदबुद्धी ।निरसुन शबलांशउपाधी ॥ १० ॥

लक्ष्यार्थि जीवेशांचे ।करिसी ऐक्य असिपदीं ॥ ११ ॥

जीवन्मुक्ती सुख थोर ।देसी परमकृपानिधी ॥ जय देव जय देव जय व्यंकटेशा ।केवळ करूणासिंधु पुरविसी आशा ।जय देव जय देव ॥ १२ ॥

जय देव जय देव जय व्यंकटेशा ।केवळ करूणासिंधु पुरविसी आशा ।जय देव जय देव ॥ १३ ॥

विवर्त हे नायरुप ।जगद्‌भासचि असार ॥ १४ ॥

जगद्‌भासचि असार ॥ १५ ॥

अधिष्ठान पूर्ण याचे ॥ १६ ॥

देव सन्मय साचार ॥ १७ ॥

मौनी म्हणे तुंचि सर्व ।भूमानंद हे अपार ॥ १८ ॥

जय देव जय देव जय व्यंकटेशा ।केवळ करूणासिंधु पुरविसी आशा ।जय देव जय देव ॥ १९ ॥

तुमचे वाचन सोबत ठेवा

साइन इन केल्यावर सर्व उपकरणांवर वाचनाची जागा जतन होते, भावार्थ पाहता येतो, रोजचे वाचन नोंदवता येते आणि निवडलेली स्मरणे मिळतात.