पोथी
साइन इन

श्री गजानन विजय ग्रंथ

अध्याय ११

अध्याय ११

अध्याय ११

अध्याय अकरावा

श्रीगणेशाय नमः ॥

हे ओंकाररूपा पशुपती हे भवानीवरा दक्षिणामूर्ती ब्रह्मांडात जितुक्या विभूती तितुकी रूपें तुझीं देवा

तुझें रुप जें निराकार जेणें हे व्यापक चराचर जें सर्वस्वी आधार अविद्या-माया-प्रकृतीला

तें स्वरुप जाणावया अशक्य आहे देवराया म्हणून तूं करण्या दया सगुण रूपें धरलीस

जैसें ज्याला वाटत तैसे तो तुला भाग देत नामामुळें तुजप्रत भिन्नत्व ये ना कधींही

शैव तुला शिव म्हणती ब्रह्म बोलती वेदान्ती रामानुजांचा सीतापती वैष्णवांचा विष्णू तूं

उपासने-प्रमाणे नांवे मिळाली तुजकारणें परी तूं अभिन्नपणें सर्वांठायींच गवससी

तूं सोमनाथ, विश्वेश्वर हीम केदार, ओंकार क्षिप्रातटाकी साचार महांकाल तूच की

नागनाथ, वैजनाथ घृष्णेश्वर वेरुळांत त्र्यंबक तुला म्हणतात गोदावरीच्या तटाकी

तूं भीमाशंकर मल्लिकार्जुन, रामेश्वर तूं गोकर्णरुपी शंकर तूं महादेव शिंगणापुरी

त्या अवघ्यांकारण असो, माझें साष्टांग नमन माझ्या त्रितापांचें हरण शीघ्र करी दीनबंधो १०

देवा तुम्ही कुबेराला क्षणांत धनपती केला मग माझ्याविषयी कां हो पडला प्रश्न तुम्हांसी गिरिजापते ? ११

बाळकृष्णाच्या सदनासी समर्थ आले दुसरें वर्षी त्या बाळापुरासी दासनवमी कारणें १२

सुकलाल बाळकृष्ण या बाळापुरालागून निस्सीम भक्त होते दोन त्यांची सरी न ये कोणा १३

या वेळी बरोबर होते पाटील भास्कर बाळाभाऊ-पितांबर गणू-जगदेव-दिंडोकार १४

उत्सव दासनवमीचा सांग झाला तेथ साचा दैवयोग भास्कराचा तेथेच आला ओढवून १५